Home महाराष्ट्र ”आम्ही ‘मी पुन्हा येईन’ असे वारंवार सांगणार नाही” संजय राऊत यांचा टोला

”आम्ही ‘मी पुन्हा येईन’ असे वारंवार सांगणार नाही” संजय राऊत यांचा टोला

0

खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबंध महाराष्ट्रात ‘मी पुन्हा येईल’ असं ओरडून सांगितलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याला धरून राऊत म्हणाले, “राज्याच्या हितासाठी किमान पुढील २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा हीच आमची इच्छा आहे. मात्र आम्ही ‘मी पुन्हा येईन’ असे वारंवार सांगणार नाही. आम्हाला महाराष्ट्रात राहायचे आहे. राज्यातच राजकारण करायचे आहे.”  

त्याचबरोबर राऊत म्हणाले की,  “आमच्यासोबत जे लोक जोडले आहेत त्यांचा राज्य चालविण्याचा अनुभव जास्त आहे. २४ तारखेनंतर मी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत सांगत आलो आहे की, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. ज्या बातम्या पेरल्या जातायेत त्या कुठून येतात माहिती आहे. महाराष्ट्राच्या योगदानात यशवंतराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येकाचा वाटा राहिला आहे. फॉर्म्युल्याची चिंता नको, त्यावर उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील.” असेही राऊत म्हणाले अशी माहिती मिळत आहे.