Home महाराष्ट्र पुणे बायकोशी अश्लील पणे बोलणाऱ्या मित्रा सोबत मित्रानेच काय केलं ? पाहून धक्का...

बायकोशी अश्लील पणे बोलणाऱ्या मित्रा सोबत मित्रानेच काय केलं ? पाहून धक्का बसेल

0
kidnapped man

प्राईम नेटवर्क : आपल्या पत्नीशी अश्लील बोलल्याच्या रागातून मित्रानेच मित्राचं अपहरण करून हत्या केल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. पुण्यात वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली आहे. या घटनेसाठी आकाश साळवे, वय २५ आणि इलियाज शेख, वय २१ यांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. रोहित किसन कांबळे, वय १९ असं अपहरण करून हत्या केलेल्या युवकांच नाव आहे.

दरम्यान रोहित कांबळे याचं गुरुवार दिनांक ३ ऑकटोबर रोजी अपहरण झालं होतं, यामुळे रोहितच्या आईने स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवली. फिर्यादी नुसार वाकड पोलीस रोहितचा शोध घेत होते. याच दरम्यान पुण्यात संगमवाडी येथे पोलिसांना रोहितचा मृतदेह मिळाला. घटनेचा अधिक तपास केला असता, मित्रानेच रोहितचा खून केल्याचं समोर आलं. मृत युवक रोहित, आरोपी आकाश आणि इलियाज हे तिघे जण चांगले मित्र होते. पिंपरी चिंचवड मध्ये ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. मृत युवक रोहित हा आकाशच्या पत्नीशी अश्लील बोलत होता. आकाशला हे समजल्यावर आकाश आणि मृत युवक रोहित यांच्यात अनेकदा वाद सुद्धा झाले. पत्नीशी कुणी अश्लील बोलणं रोहितला शांत बसू देत नव्हतं. म्हणून आरोपी आकाशने मित्र इलियाज याच्या सोबत मृत युवक रोहितच्या खुनाचा कट आखला.

योजने प्रमाणे गुरुवारी याच रिक्षातून लोणावळा येथे आपण फिरायला जात असल्याचं सांगून, दोघांनी त्याला तळेगाव परिसरात भेगडेवाडी येथे नेलं, या ठिकाणी मृत युवक रोहित आणि आरोपी आकाश यांच्या मध्ये जोरदार भांडण झालं, यावेळी आकाशने मित्र इलियाज याच्या मदतीने मृत युवक रोहित याचा गळा दाबून खून केला. यांनतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह संगमवाडी परिसरात बेवारस म्हणून फेकून दिला. दरम्यान वाकड पोलीस स्थानकातील सहायक पोलीस निरीक्षक हरिश माने यांनी शिताफीने आरोपींना गजाआड केलं.