Home महाराष्ट्र काय घडलं उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या भेटीमध्ये? महाआघाडीत बिघाडी? वाचा सविस्तर...

काय घडलं उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या भेटीमध्ये? महाआघाडीत बिघाडी? वाचा सविस्तर वृत्त…

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची मानण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविध अडचणी व केंद्र-राज्य संबंध याबाबत ही बैठक होती असे आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

राज्यांना देण्यात येणारा GST परतावा, पंतप्रधान फसल बिमा योजना, केंद्र रस्ते निधी, बळीराजा संजीवनी योजना, PMC बँक घोटाळा या विषयांवर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात सखोल चर्चा झाली. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पारंपरिक ऊर्जा स्रोत, द्रुतगती मार्गांचे सौरीकरण, प्लास्टिक बंदी या गोष्टींवर चर्चासत्र घडविले.

भीमा कोरेगाव व एल्गार परिषद प्रकरणातील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यावरून महाआघाडीत फूट पडल्याचे दिसून येत असतांना मुख्यमंत्र्यांची ही भेट काही वेगळी खिचडी तर शिजवत नाही आहे ना याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात परत भाजप शिवसेना एकत्र येतील की काय हा प्रश्न या भेटीनंतर पडणे स्वाभिवक आहे!

आदित्य ठाकरे काय म्हणाले या भेटीतबाबत जाणून घ्या खालील ट्विट वरून :