Home महाराष्ट्र मी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहिल्याने माझ्यावर अशी वेळ आली : एकनाथ खडसे

मी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहिल्याने माझ्यावर अशी वेळ आली : एकनाथ खडसे

0

प्राईम नेटवर्क : मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्याचं महागात पडल्याचं भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण अंबानींसह इतर श्रीमंतांनी हडप केलेल्या जमिनी सरकार जमा करण्याची तयारी सुरु केल्याने आपल्यावर हि वेळ आली. अल्प संख्यांक समाजा तर्फे खडसेंचा जळगाव येथे जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

 

मी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणं काहींना रुचलं नाही, एका मोठ्या व्यक्तीने मुस्लिम समाजाच्या जमिनीवर बांधलेले घेर जमीनदोस्त करून जमीन सरकार जमा करण्याचे आदेश दिले, त्यांनी अनाथाश्रमाच्या जमिनीवर घर बांधले होते, ती व्यक्ती दुसरी, तिसरी कोणी नसून मुकेश अंबांनी निघाले. आपण घेतलेले निर्णय सरकार मधील इतरांना रुचले नाहीत. मुख्यमंत्री पदाची स्वप्न पहिल्यांनंतर आपल्यावे अशी वेळ आल्याचं त्यांनी म्हटलं.