Home महाराष्ट्र मी राज ठाकरे यांची समजूत काढायला गेलो तेव्हा माझी गाडीही फोडली होती...

मी राज ठाकरे यांची समजूत काढायला गेलो तेव्हा माझी गाडीही फोडली होती : संजय राऊत

0

एका वृत्त वाहिनीशी बोलतांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी विविध विषयांवर चांगलीच फटकेबाजी केली. “राज ठाकरे त्यावेळीही माझे मित्र होते, आज सुद्धा आहेत, काय घाबरतो का?” या त्यांच्या प्रतिक्रियेने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा पेटली. दरम्यान बोलतांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही तोंडभरून वाहवा केली.

पुढारी वृत्तपत्राच्या एका ऑनलाईन रिपोर्ट नुसार राऊत यांनी “मी राज ठाकरे यांची समजूत काढायला गेलो असता माझी गाडी देखील फोडली होती. मात्र जे झाले ते झाले. त्यावेळीही राज हे माझे मित्र होते, आजही आहेत. काय घाबरतो का?” असं स्पष्ट शब्दांत त्यांनी मुलाखती दरम्यान उत्तर दिलं. पुढे बोलतांना राऊत यांनी राज ठाकरे कसे शिवसेनेतून बाहेर पडले व राऊत शिवसेनेतच राहिले त्याबद्दल सांगितले व बाळासाहेब आणि शरद पवार हे जनसामान्यांचे कैवारी असल्याचंही त्यांनी सांगितलं.