Home महाराष्ट्र पांढरा कोब्रा पाहून गावात खळबळ; सापाच्या अतिशय दुर्मिळ प्रजातींचं गावकऱ्यांना दर्शन

पांढरा कोब्रा पाहून गावात खळबळ; सापाच्या अतिशय दुर्मिळ प्रजातींचं गावकऱ्यांना दर्शन

0

मंगळवारी गोंदियातील चांगोटोला येथे एक अतिशय दुर्मीळ असा पांढरा कोब्रा पाहायला मिळाला. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात या सापाची प्रजाती अत्यंत दुर्मिळ होत चालली आहे. या पांढऱ्या कोबराला अल्बिनो कोबरा असं म्हटलं जातं. लोकमतच्या एका रिपोर्टनुसार हा आगळा वेगळा साप पाहून गावकरी हैराण झाले, अगदी घाबरले सुध्दा व ताबडतोब वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने तातडीने सदर ठिकाणी येऊन हा सहा फुटाचा साप ताब्यात घेतला व त्याला जंगलात सुरक्षित सोडलं.

गावात साप पाहण्यासाठी भरपूर गर्दी जमली होती. त्यात अनेक जण या सापाला पाहून घाबरलेले होते. मात्र वनविभागाचे कर्मचारी साप घेऊन गेल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा स्वास घेतला. पांढऱ्या रंगामुळे या सापाला चीनमध्ये पवित्र मानलं जातं. खरं तर जेनेटिक डिसऑर्डर म्हणजेच जनुकीय दोषामुळे या सापाचा रंग पांढरा शुभ्र असतो अशी माहिती लोकमतने एका रिपोर्ट मध्ये दिली. या सापाच्या पांढऱ्या रंगामुळेच ही प्रजाती दुर्मीळ होत चालली आहे. या रंगामुळे या सापांना लपून राहता येत नाही व शिकार होतात परिणामी ही प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.