Home महाराष्ट्र शिवसेना सोबत न आल्यास केवळ भाजप सरकारचा शपथविधी होणार? भाजपची खंबीर भुमीका

शिवसेना सोबत न आल्यास केवळ भाजप सरकारचा शपथविधी होणार? भाजपची खंबीर भुमीका

0
devendra fadnavis

राज्याचं नेतृत्व कोण करणार हे अद्याप ठरत नाहीये. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना भाजप यांच्यातील रस्सीखेच तसुभरही कमी झालेली नाही. अशात जर सत्तास्थापनेसाठी शिवसेना सोबत आली तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारचा किंवा सोबत न आल्यास केवळ भाजप सरकारचा शपथविधी होणार आहे अशी माहिती लोकमतच्या रिपोर्ट नुसार मिळत आहे.

अधिक माहिती नुसार “शिवसेनेला दिलेल्या प्रस्तावासंदर्भात प्रतिसादाची अखेरपर्यंत वाट पाहू. तोपर्यंत तिढा सुटला नाही तर २०१४ प्रमाणे केवळ भाजप मंत्र्यांचा शपथविधी करावा” असे भाजपमध्ये ठरले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यापूर्वी शिवसेनेने मंत्रिमंडळात सहभागी व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. ते प्रयत्न सफल झाले किंवा अपयशी जरी ठरले तरी ७ नोव्हेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी करायचा, हे भाजपचे ठरले आहे. भाजपने महसूल आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती शिवसेनेला देण्याची तयारी दर्शवली आहे. उपमुख्यमंत्रीपदासह १६ मंत्रिपदे देऊ केली आहेत. तथापि नगर विकास, वित्त आणि गृह ही खाती मात्र देण्यास सपशेल नकार दिला असे सांगितले जात आहे.