Home महाराष्ट्र बीडमध्ये ताईला मिळणार दादाची साथ, धनंजय मुंडेंसह, सुनील तटकरे भाजप सोबत

बीडमध्ये ताईला मिळणार दादाची साथ, धनंजय मुंडेंसह, सुनील तटकरे भाजप सोबत

0

प्राईम नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय, अजित पवारांना धनंजय मुंडे यांनी साथ देत असल्याचं समोर आलं आहे, धनंजय मुंडे यांच्यासह सुनील तटकरे यांची हि भाजप सोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे, पत्रकार धंनजय मुंडे यांच्या घरी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी घरी गेले असता, ते नातेवाईकाकडे गेले असल्याचं यावेळी त्यांना सांगण्यात आलं, मात्र जेव्हा पत्रकारांनी धनंजय मुंडे यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा धनंजय मुंडे यांचा फोन बंद होता, या सोबत धंनजय मुंडे अजित पवार यांच्या शपथ विधीला हजर असल्याचे यावेळी बोलले जात होते, यामुळे धनंजय मुंडे अजित पवारांसह भाजपच्या गोटात गेल्याच वृत्त समोर येत आहे, धंनजय मुंडे यांच्या सोबत कोण आणि किती आमदार जाणार अशी चर्चा यावेळी रंगताना दिसत आहे.

दरम्यान राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचे आभार व्यक्त करत म्हटले आहे कि, त्यांनी पुन्हा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्या बद्दल आभारी आहे, राज्यातील जनादेशाला शिवसेनेने नाकारले आहे, त्यांनी दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीला सामोरं जावं लागलं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, आज सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, लवकरच विधिमंडळात बहुमत सिद्ध करू असं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केलं.