
महाजनादेश यात्रेदरम्यान काल एक तरुणीने मुख्यमंत्राच्या ताफ्यावर शाईचा फुगा फेकला. दरम्यान ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधूकर पिचड यांना भाजपात उमेदवारी देऊ नयेआणि महिलांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना कराव्या व सरकारचं महापोर्टल बंद करावं अशा मागण्या करत होती. अहमदनगर जिल्ह्यात अकोले येथे ही घटना घडली असून सदर तरुणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या ओघात अकोले येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. महाजनादेश यात्रेला संबोधित करत फडणवीस यांचा ताफा अकोले येथे आला असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती शर्मिला येवलेने जोरजोरात घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दिशेने शाईचा फुगा फेकला. मात्र हा फुगा ताफ्यापर्यंतन जाता मध्येच रस्त्यावर पडून फुटला. सदर तरुणीवर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही असे सूत्रांकडून कळत आहे पण यामागे काही राजकीय स्वार्थ आल्याचे नाकारता येत नाही.