Home महाराष्ट्र “हो आम्ही शिवसेनेला फसवलं, पण आमच्या चुकीचा तुम्ही मोठा फायदा घेतला”- मुनगंटीवार

“हो आम्ही शिवसेनेला फसवलं, पण आमच्या चुकीचा तुम्ही मोठा फायदा घेतला”- मुनगंटीवार

0

मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावरून शिवसेना आणि भाजपाचे संबंध तुटल्यानंतर हे दोन्ही पक्ष एकमेकांवर फसवणुक केल्याचा आरोप सतत करत होते. मात्र भाजपाने शिवसेनेला फसवल्याची कबुली भाजपाचे ज्येष्ठ नेते ‘सुधीर मुनगुंटीवार’ यांनी आज विधानसभे मध्ये दिली, “आम्ही शिवसेनेला फसवले, पण आमच्या चुकीचा तुम्ही एवढा मोठा फायदा फायदा उचलला! कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू”,असं आश्चर्यकारक विधान सुधीर मुनगुंटीवार यांनी विधानसभेत केलं.

लोकसभा निवडणुकीआधी युती करताना मातोश्रीवर उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती याच बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीचे डावपेच व मुख्यमंत्री पदाच्या शर्तीअटीसह ठरले होते.मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष देण्याचा शब्द भाजपच्या नेत्यांनी दिला असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आणि भाजप खोटं बोलत असल्याचं विधान पुन्हा पुन्हा केलं होतं. तर मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष देण्याचा शब्द दिलाचं नव्हता असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी करत शिवसेनेला खोटं पाडलं होतं.

या दोहोंपैकी कोण खरे व कोण खोटे हे काही कळण्यासाठी मार्ग नव्हता दरम्यानच्या काळात भाजपशी फिस्कटल्यामुळे शिवसेनेने काँग्रेस सोबत युती करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री सुद्धा झाले. आणि आता मुनगंटीवार यांनी स्वतःहुन शिवसेनेला फसवले असल्याचे कबुली दिली त्यामुळे शिवसेना त्यावेळी खरं बोलत होती हे नक्की!