
प्राईम नेटवर्क : काय ? फ्री ? कुठे ? केव्हा ? अशा बऱ्याच प्रश्नांची भेळ-मिसळ सुरु असेल तर थांबा आधी पूर्ण बातमी काय आहे ते तर बघा..!
मंडळी, आसाम सरकारनं पुढच्या वित्त वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी २०१९-२० च्या आर्थिक वर्षांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत त्यापैकीच ही एक “गरिबांना १ रु. किलो तांदूळ आणि नववधूला १ तोळा सोनं मोफत.” यामध्ये स्वस्त पोषण आहार सहाय्यता योजनेचीही तरतूद करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत ५३ लाख लाभार्थी कुटुंबियांना खाद्य सुरक्षेअंतर्गत ३ रुपायांऐवजी प्रतिकिलो १ रु. तांदूळ मिळणार आहेत. आता दो रुपये नाही तर एक रुपया भी बहोत बडी चीज होती है बाबू !
इतकचं नाही तर, आसाममधल्या सर्व समुदायाच्या नववधूला एक तोळा सोनं दिल जाणार आहे. शिक्षणासाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके पुरवणार आहेत. सरकारी कॉलेज, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणार असून मेस बिलात १० महिन्यापर्यंत अनुदान म्हणून ७०० रु. दिले जाणार आहेत.
अल्पसंख्याक समुदायातील मुलींना उच्च शिक्षणासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विधवा महिलांना ६० वर्ष वयोमर्यादेपर्यंत प्रतिमहा २५० रु. पेन्शन तसेच चहा बागायत क्षेत्रातील मजुरांच्या कुटुंबाला प्रतिकिलो २ रु. साखर देण्यात येणार आहे. आहे की नाही बढिया खबर !