जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने सर्वांना भयभित केले आहे. या जीवघेण्या व्हायरसने चीनमधून उगम होत होत इराण, जपान, अफगाणिस्तान मध्ये शिरकाव करत आता त्याने भारतात सुद्धा मजल मारली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २८ वर पोहोचल्याची माहिती दिली आहे. इटलीतून भारतात आलेले १६ पर्यटक बाधित झाले असून त्यांच्या संपर्कातील त्यांचा भारतीय ड्रायव्हर सुद्धा कोरोना ग्रस्त झालेला आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा उपलब्ध केलेल्या आहेत. आणखी १९ प्रयोगशाळांची निर्मिती सरकारकडून केली जात आहे. तसंच परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. सर्व रुग्णालयांना स्वतंत्र कक्ष उभारण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे.
कसा कराल स्वतःचा बचाव कोरोना व्हायरस पासून?
कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य रोग असून जास्तीत जास्त वेळी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच कोरोना हा घाणीमार्फत जास्ती पसरतो त्यामुळे आजूबाजूच्या परिसराची तसेच स्वतःची नीट योग्य स्वच्छता व निगा राखणे आवश्यक ठरते. प्रत्येक अर्धा तासाला चांगल्या हॅन्डवॉशने हाथ धुवावेत असे डॉक्टर सांगतात. कोरोनाच्या संशयित रुग्णांपासून दूरच राहावे.
वाचा काय म्हणाले मंत्री हर्षवर्धन…