
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवलेला आहे. संसर्ग रोखण्यासाठी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी घरी राहण्याचं आवाहन पोलीस आणि पंतप्रधान मोदींकडून केलं जात आहे. तमिळनाडूमध्ये मात्र अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पंतप्रधान मोदींचं आवाहनाला न जुमानता आणि प्रशासनाच्या लॉकडाऊनच्या नियमांना पायदळी तुडवत हजारोंच्या संख्येनं लोक एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित झाले होते. ही घटना मदुरै या परिसरात घडल्याचं पाहायला मिळालं. इथे जमलेल्या कुणालाही कोरोनाची भीती वाटत नव्हती का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
देशभऱात जमावबंदी लागू असतानाही हजारोंच्या संख्येनं लोक इथे उपस्थित होते.या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तेथील आयुक्तांनी मदुरै इथे जमलेल्यांपैकी ०३ हजार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ आणि फोटोच्या आधारावर एफआयआर दाखल कऱण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.तामिळनाडू पोलिसांनी बुधवारी सांगितले की, लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत सुमारे दोन लाख एफआयआर नोंदविण्यात आले आहेत, तर दीड लाखाहून अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. दुसरीकडे, मास्क न घालता बाहेर पडणाऱ्यांना १०० रुपये दंड आकारला जाईल आणि त्याचप्रमाणे वाहनचालकांचा वाहन परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
देशात २ लाख लोकांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत १ लाख ३४ हजार ६१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारहून अधिक आहे. तर आतापर्यंत ४१४ रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.