Home आरोग्य कर्नाटक मध्ये १० वीच्या परीक्षा घेतल्या गेल्यापैकी ३२ विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण, आठ...

कर्नाटक मध्ये १० वीच्या परीक्षा घेतल्या गेल्यापैकी ३२ विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण, आठ लाख विद्यार्थ्यांनि दिली परीक्षा

0

कर्नाटक बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा कोरोना लॉकडाऊन मध्ये घेण्याचा धाडसी निर्णय घेतला होता, प्रत्येक केंद्रावर सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायसर चा उपयोग करण्यात आला मात्र तरी सुद्धा ३२ विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे जवळ जवळ ८० विद्यार्थ्यांना विलगिकरन कक्षात ठेवण्यात आले असून, शेकडो विद्यार्थ्यांच्या कोरोना टेस्ट करने सुरू आहे.

कर्नाटक बोर्डाची दहावीची परीक्षा २५ जुन ते ०३ जुलै या कालावधी मध्ये घेण्यात आली. कोरोना मुळे परीक्षा घ्याव्यात की नाही या साठी कर्नाटक सरकार संभ्रमात होते मात्र ही परीक्षा अखेर घेण्यात आली. आज परीक्षा झक्यानंतर एक आठवड्याभरात ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या त्यांच्या कोरोना चाचण्या पॉसिटीव्ह येण्यास सुरुवात झाली आहे. ही परीक्षा देण्यासाठी जवळ जवळ ८ लाख विद्यार्थी विविध केंद्रांवर हजर होते त्यामुळे आता या सर्व विद्यार्थ्यांना कोरोणाची भीती आहे.

कोरोना काळात परीक्षा घेणे खरंच योग्य आहे का हे वरील घटनेवरून दिसून येते, केंद्र सरकारने विद्यापीठ आयोगाला पदवीच्या परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली असून. देशभरात पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये साहजिकच घबराट आहे. परीक्षेला जाऊन कोरोना अंगावर ओढून घेणे हे असह्य आहे असे पालक आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.