Home आरोग्य कोरोनामुळे सेवा क्षेत्रातील ४ कोटी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात: CREDAI

कोरोनामुळे सेवा क्षेत्रातील ४ कोटी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात: CREDAI

0


कोरोना व्हायरस उद्रेकामुळे लॉकडाऊन आणि त्यातूनच रिटेल, हॉटेल आणि पूरक व्यवसायचे तीन तेरा वाजले असून या क्षेत्रातील तब्बल ४ कोटी कर्मचा-यांवर बेजोरगारीची कु-हाड कोसळली आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरसुद्धा या व्यवसायांमधून मिळत असलेला महसूल हा किमान २० ते २५ टक्के घटणार असून हे व्यवसाय आणि यामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचा-यांचे भविष्य एकंदर अवघड होतं चालले आहे.


आपल्या देशातील अनेक सल्लागार संस्थांनि नोंदवलेल्या निरिक्षणांचा आधार घेऊन ‘क्रेडाई(CREDAI)आणि एमसीएचआय(MCHI)’या बांधकाम व्यावसायीकांसाठीच्या संघटनांनी नुकताच एक अहवाल प्रसिध्द केला आहे. या अवहालात बांधकाम व्यवसायउद्योगासह रिटेल, हॉस्पिटॅलीटी आणि संलग्न उद्योगांची सध्यस्थिती आणि भवितव्याचाही आढावा घेण्यात आला आहे.

या अवहालानुसार लॉकडाऊनच्या काळामध्ये देशातील हॉटेल, बेक्वेट हॉल आणि गेस्ट हाऊस यांना कमीत कमी ४७० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये नामांकीत हॉटेलांमधिल प्रत्येक रुमचे भाडे ४ ते ७ टक्क्यांनी कमी झाले होते.या वर्षात देशातील हॉटेलमधली बुकींग १८ ते २० टक्क्यांनी तर महसुल १२ ते १४ टक्क्यांनी कमी होईल असा प्राथमिक अंदाज आहे. नामांकीत ब्रॅण्डेड क्षेत्रातील अस्थापनांचा महसुल येत्या वर्षभरात २७ ते ३२ टक्क्यांनी घटणार आहे.इंडियन टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलीटी यांच्या निरिक्षणानुसार या क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साडे पाच कोटी लोकांना रोजगार मिळतो. त्यापैकी ३ कोटी ८० लाख लोकांचा रोजगार पूर्ण बुडाला आहे.

मॉर्डन रिटेलची १५ लाख स्टोअर्स देशभरात असून त्यांचा व्यवसाय तब्बल ४ लाख ७५ हजार कोटी इतका प्रचंड आहे. जवळपास ६ कोटी लोकांना यामधून रोजगार मिळतो. लॉकडाऊनमुळे हे सर्व मॉल आणि रिटेल स्टोअर्स बंद आहेत.येत्या काही दिवसांत जवळपास ३० टक्के रिटेल स्टोअर्स बंद पडण्याची भीती असून त्यातून सुमारे १८ लाख कर्मचा-यांना आपला रोजगार गमवावा लागेल अशी भीतीसुध्दा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.