Home आरोग्य Covid -19 च्या रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू..

Covid -19 च्या रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू..

0

कोरोना महामारीच संकट असतांनाच एक दुःखत घटना घडली आहे. अहमदाबाद येथील नवरंगपूरा परिसरातील श्रेय रुग्णालयात भीषण आग लागल्याचे समजले आहे.

या रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये 8 कोरोना रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. हे रुग्णालय कोविड 19 रुग्णालय आहे. मरण पावलेले रुग्ण हे आयसीयूमधील होते.

रात्री २:३० च्या सुमारास अचानक रुग्णालयात शॉर्ट सर्किट झाल्याने ही घटना घडली आहे. ही माहिती अग्निशमन दलाला कळताच त्यांनी योग्य ती हालचाल केली आहे आणि आयसीयूमधील 35 कोरोना रुग्णांना वाचवून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात यश मिळवले आहे. मात्र अचानक झालेल्या या घटनेमुळे आणि अग्निशमन येईपर्यंत आगीने घेतलेल्या रौद्र रुपामुळे ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता मृत झालेल्या रुग्णांच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे केतकी कानेटकर यांनी ट्विट मार्फत सांगितले आहे.