दिल्ली दंगलीबाबत एक बाब समोर येत असतांनाच आम आदमी पक्षाच्या नगरसेवकावर या दंगली भडकवण्याचा आरोप करण्यात येत आहे. दंगलीनंतर समोर आलेल्या काही छायाचित्रांमुळे त्या नगरसेवकाच्या भूमिकेविषयी संशय घेण्यात येत आहे. ताहीर हुसेन असे या नगरसेवकाचे नाव असून दंगली दरम्यान त्यांच्या घरावर पेट्रोल, बॉम्ब, कट्टे आणि विटा व दगडांचा रिच ठेवण्यात आला असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर वायरल झाली आहेत. एका व्हिडिओमध्ये जाळपोळ सुरू असताना ताहीर हुसेन घराच्या छतावरून संशयास्पद गोष्टी करत असताना दिसून येत आहे. दरम्यान आपण निर्दोष असल्याचा निर्वाळा हा नगरसेवक देत आहे तसेच आम आदमी पक्षाने सुद्धा त्याला पाठिंबा जाहीर केला आहे.

गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या ताहीर हुसेन यांच्या इलाख्यात झाली होती व त्यानंतर त्यांचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला होता. अंकित तिवारी यांच्या परिवाराने ही निर्घृण हत्या व उत्तर पूर्व भागात उसळलेल्या दंगली मागे ताहीर हुसेन याचा हात असल्याचे सांगत त्याला अटक करण्याची मागणी होत आहे. दरम्यान ताहीर हुसेन यांनी पुढीलप्रमाणे निर्वाळा दिला, ” मला बातम्यांमधून कळले आहे की माझ्यावर एका व्यक्तीच्या खुनाचा आरोप झाला आहे, हे धाधांत खोटे असून माझ्यावर बिनबुडाचे आरोप होत आहेत. मी माझ्या परिवाराच्या सुरक्षतेसाठी पोलिसांसमोर सोमवारीच माझे घर सोडून सुरक्षित स्थळावर आलो आहे,माझ्यावर आरोप करणे अत्यन्त चुकीचे असून माझ्या परिवाराचा सुद्धा या गोष्टीशी काहीही संबंध नाही.”
