
बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 54 व्या वर्षी मुंबई मधील कोलिकाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. काल त्याची प्रकृती खालावल्यामुळे कोलिकाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोलन इंफेक्शन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 2018 मध्ये इरफान खान याला Neuroendocrine Tumour चे निदान झाले होते. त्यानंतर युके मध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. इरफान खान यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे इंग्रेजी मिडियम या सिनेमाच्या प्रमोशनलाही त्याने हजेरी लावली नव्हती.
यासंदर्भात माहिती देणारे अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे.त्यात असे म्हटले आहे की, इंग्रेजी मिडीयम सिनेमाच्या अभिनेत्याला सध्या ICU मध्ये ठेवण्यात आले असून त्याची टीम इरफानच्या प्रकृती बाबतची माहिती चाहत्यांना देत राहील. इरफान खान याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी चाहत्यांसह सर्वांसाठी धक्कादायक होती. त्यानंतर इरफानच्या प्रकृती बाबत अनेका अफवा जोर धरु लागल्या. त्यानंतर इरफान खान याच्या प्रवक्ताने याबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटले की, इरफान अजूनही आजाराशी झुंज देत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
मात्र आज सकाळी ११ वाजता शुजित सरकार या दिग्दर्शकांनी इरफान खान यांना श्रद्धांजली देत एक ट्विट केले आणि इरफान खान हे आता हयात नाहीत हे समजले. ही बातमी कळताच जगभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून प्रत्येकजण आपल्या कडून श्रद्धांजली वाहत आहे. इरफान खान यांनी भारतीय सिनेमाचं नाही तर हॉलीवूड मध्ये सुद्धा दमदार अभिनय करत जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांचा इंग्लिश मिडीयम हा सिनेमा नुकताच चर्चेत होता.