Home राजकीय वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षण स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, अशोक चव्हाण यांनी...

वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षण स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, अशोक चव्हाण यांनी दिली माहिती

0

मराठा आरक्षण संबंधी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज दिलेल्या सुनावणी संबंधी महत्वाची माहिती दिली आहे.

“पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे, मराठा आरक्षण स्थगित करण्यास नकार दिला आहे”, असे ट्विट करत अशोक चव्हाण यांनी माहिती दिली. या खटल्यात आज होणारी अंतिम सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली असून ती २७ जुलै ला होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, या संबंधी खटल्याची सुनावणी कार्यवाही ही न्यायमूर्ती एल एन मूर्ती यांच्याकडे सुरू आहे. चव्हाण यांच्या मते न्यायालयात याचिकाकर्ते यांनी मराठा आरक्षण संबंधी प्रवेश रद्द करण्यास अंतरिम आदेश काढण्यासाठी खूप मागणी केली मात्र न्यायालयाने बजावून सांगितले की काहीही झाले तर आम्ही अंतरिम आदेश काढणार नाही.

अशोक चव्हाण यांनी न्यायालयात मराठा आरक्षण बाजू ही अतिशय भक्कम असल्याची माहिती दिली आहे, कपिल सिब्बल यांसारखे निष्णात वकील मराठा समाजाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणार असुन अशाच अनेक दिग्गज वकिलांचा २७ तारखेच्या दिवशी न्यायालयात समावेश राहणार आहे.