Home राष्ट्रीय अमित शहा परत एम्स रुग्णालयात दाखल!

अमित शहा परत एम्स रुग्णालयात दाखल!

0

गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी कोरोनावर मात केली होती. परंतु ,घरी आल्यानंतर पोस्ट कोविड लक्षणे दिसून आल्यास परत त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी त्यांना परत थकवा आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला त्यामुळे ते लगेचच एम्स रुग्णालयात गेले. आता ते तिथे स्वथ्य असून रुग्णालयातून काम करत असल्याची माहीती रुग्णालयाने दिली.

तसेच, त्यांनी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर स्वतः ट्विट करून माहिती दिली होती. त्यांना कोरोना झाल्याची माहिती ही 2 ऑगस्ट ला समोर आली होती. जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला.