
क्वारंटाइन कालावधी संपल्या नंतर रविवारी 17 तबलिगी मुसलमानांना तुरूंगात पाठविण्यात आले आहे. या आधी त्यांना दंडाधिकार्यां समोर हजर केले आणि नंतर तुरूंगात पाठविले. या सर्वांना व्हिसा आणि पासपोर्ट नियमांचे उल्लंघन केल्या बद्दल दोषी ठरविण्यात आले होते. हे सर्व जमाती मुसलमान इंडोनेशिया आणि थायलंडमधील आहेत.
सरकारी प्रवक्त्यां कडून दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी ताज आणि कुरेशी मशिदींमधून १७ परदेशी नागरिकांसह २१ जमाती तबलिगींना अटक केली आणि हे सर्व ३१ मार्च रोजी क्वारंटाइन ठेवण्यात आले. नंतर त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले गेले, जे निगेटिव निघाले.
यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 269, 270, 271, 188 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला होता, ज्यात साथीचे रोग कायदा (1897) 03 आणि पासपोर्ट कायदा (1967) कलम 12 (3) यांचा समावेश होता. हे सर्व तबलिगी मशिदीत हजर असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती.