Home राजकीय बिहार विधानसभा निवडणूक: संपूर्ण बिहारला कोरोना लस मोफत देण्याचे भाजपचे आवाहन

बिहार विधानसभा निवडणूक: संपूर्ण बिहारला कोरोना लस मोफत देण्याचे भाजपचे आवाहन

0

पुढील आठवड्यात बिहार विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे सर्व पक्ष कसोशीने तयारीला लागले असून प्रचार करत आहेत. अशातच भाजपने निवडून आल्यास संपूर्ण बिहारला कोरोना लस मोफत देण्याचे आवाहन केले. आज भाजपने निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला त्यात हे आवाहन केले. तसेच पाटणा येथे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी भाजपच्या संकल्पपत्रातलं हे पहिलं आवाहन असल्याचं सांगितलं.

एकीकडे भाजप समर्थकांकडून याचे कौतुक केले जात आहे तर दुसरीकडे भाजप जागतिक आरोग्य संकटाचं राजकारण करत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते साकेत गोखले यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारदेखील केली आहे. या आवाहनातून भाजप बिहारच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचे साकेत गोखले यांनी तक्रारीत नमूद केले.

बीबीसी मराठीच्या मीडिया न्यूजनुसार यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले कि, “भाजपच्या जाहीरनाम्यात कोविड लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्राकडून राज्यांना नाममात्र दराने ही लस देण्यात येईल. ती नागरिकांना विनामूल्य द्यायची की शुल्क आकारायचे हे राज्य सरकारने ठरवायचे आहे. आरोग्य हा राज्य सरकारचा विषय असल्याने लस मोफत देण्याचा निर्णय बिहारमधील भाजपाने घेतला आहे.”