Home राजकीय CAA सर्मथनार्थ गोव्यात महारॅली व जाहीर सभेचे आयोजन!

CAA सर्मथनार्थ गोव्यात महारॅली व जाहीर सभेचे आयोजन!

0

एकीकडे CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशात होत असलेला विरोध जरा थंडावला तोच सुसरीकडे गोव्यात पनजी येथे शुक्रवारी समर्थन दर्शवण्यासाठी भाजपतर्फे महारॅली काढण्यात आली. सामनाच्या एका रिपोर्ट नुसार या जाहीर सभेला 20 हजार पेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली होती. महारॅली व सभेसाठी शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उ दोघांच्या नेतृत्वाखाली पाटोच्या पर्यटन भवना जवळून या महारॅलीला सुरुवात झाली होती. संपूर्ण पणजी शहर फिरुन महारॅली आझाद मैदानावर स्थिरावली व पुढे या महारॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. दरम्यान सभेचे नेतृत्व करताना जे. पी. नड्डा यांनी CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन करत राहुल गांधी यांच्यावर सणसणीत टीका करत ‘सीएएबाबत विरोध का आहे हे दोन ओळीत सांगावे’ असे आव्हान दिले आहे यावर आता राहुल गांधी यांची काय भूमिका असेल हे तर वेळच सांगेल.