
संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात घट्ट अडकलेला असताना हा विळखा काही कमी होण्याचे नाव नाही घेत आहे. मुंबईसह महाराष्ट्राची कोरोना रुग्णांची संख्या ५३ हजरांवर पोचली आहे. हे जास्ती वाटत असेल तर थांबा AIIMS या भारतातील उत्कृष्ट दर्जाच्या वैद्यकीय संस्थेच्या डॉक्टरांनी यापेक्षा वाईट बातमी दिली आहे.
आपला कोरोना विषाणूशी लढतानाचा तब्बल तिसरा लॉकडाउन सुरू आहे, सगळे शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढतीचं आहे. एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे तर तिला पूर्वरत कसे करता येईल यासाठी प्रयत्न करण्याच्या मार्गतच असंख्य अडचणी येत आहेत.
देशातील कोरोनाचा कहर मे अखेरीस संपुष्टात येईल असे ठोकताळे लावत सरकारने नियोजन आखले, परंतु आता AIIMS च्या दिग्गज डॉक्टरांनी सांगितले आहे की, ” ज्या प्रकारे देशातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे, त्याप्रमाणे DATA ANALYSIS केला असता असे लक्षात आले आहे की जून आणि जुलै महिन्यामध्ये कोरोनाचा कहर हा शिगेला पोहोचला असेल! आणि त्यावेळी परिस्तिथी किती हलाखीची असेल हे सांगणे अत्यंत अवघड आहे. आत्ता वाढवलेल्या लॉकडाउन चा फायदा कितपत होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे वेळचं देऊ शकते”
सध्या भारतात सध्या कोरोनाचे ५३ हजारांच्या रुग्ण आहेत. देशात १६०० च्या वर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. त्यामुळे आता एम्सच्या अधीक्षकांनी दिलेला इशारा खरा ठरतो का आणि ठरला तर सरकार यावर काय उपाययोजना करतं हे बघणं महत्वाचं असणार आहे.