राफेल विरोधातील पुनर्विरकाची मागणी आज न्यायालयाने फेटाळली आहे. मीडिया न्यूज नुसार राफेलच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची पुन्हा गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. यावेळी राफेल प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मागितलेली माफीदेखील न्यायालयाने मान्य केली. दसॉल्ट कंपनीकडून राफेल विमाने खरेदी करण्याच्या करारात पूर्वीच्या कराराच्या तुलनेत जास्त रक्कम खर्च झाली असून सगळी निर्णय प्रक्रियाच सदोष होती असा आरोप काँग्रेससह इतर विरोधकांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाने मोदींसरकारला निर्दोषत्व बहाल केले होतं.
अधिक मिळालेल्या माहिती नुसार फ्रान्सच्या दसॉल्ट अॅव्हीएशन कंपनीकडून राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या मुद्दय़ावर मोदी सरकारला निर्दोषत्व बहाल करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राफेल विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे.