Home राष्ट्रीय सावधान पाकिस्तान, सध्या भारत करतोय तुमच्यावर मोठ्या कारवाईची तयारी !

सावधान पाकिस्तान, सध्या भारत करतोय तुमच्यावर मोठ्या कारवाईची तयारी !

0

प्राईम नेटवर्क : पाकिस्तान सावधान, सध्या भारत करतोय तुमच्यावर मोठ्या कारवाईची तयारी, होय, हे खरं होऊ शकतं, काल मंगळवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेतीन वाजता, मिराज २००० या भारताच्या १२ विमानांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ नष्ट करत पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे, भारताने केलेल्या या कारवाईत जवळपास ३०० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारताला यश मिळालं आहे.

म्हणून भारत पाकिस्तान सीमेवर अजून मोठी कारवाई करू शकतो 

अर्थात पाकिस्तानवर इतकी मोठी कारवाई केल्या नंतर ही भारताने याचा मोठा गाजावाजा करणं अपेक्षित होतं, आत्ता पर्यंत सरकारी अधिकारी किंवा मंत्री, पंतप्रधानां कडून याच्या वर विस्तृत भाष्य करणं अपेक्षित होतं, परंतु भारताने यावर जास्त प्रतिक्रिया देणं टाळलं, यावेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवां कडून फक्त ३ मिनिटांची पत्रकार परिषद घेऊन या बद्दल माहिती दिली, पाकिस्तानी मीडियात यावर खूप हसण्यावारी नेलं गेलं, मात्र भारताची हि चुप्पी खूप काही सांगू शकते, भविष्यात पाकिस्तान किंवा पाकिस्तान सीमेवर अजून भारत मोठ्या प्रमाणावर कारवाई करू शकतो, म्हणूनच भारत यावेळी जास्त प्रतिक्रिया न देता शांत बसणं पसंत केलं आहे, अशी शक्यता नाकारता येत नाही.

भारत जेव्हा जेव्हा शांत बसतो, तेव्हा पाकिस्तानला धडा शिकवतो

दुसरीकडे भारत हा पाकिस्तान कडून चूक होण्याची वाट पाहत आहे, किंवा पाकिस्तान या कारवाई नंतर अधिक बिथरू नये, हा सुद्धा यामागे उद्देश असू शकतो. मात्र पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाई नंतर भारत जेव्हा जेव्हा शांत बसतो, तेव्हा पाकिस्तानला धडा शिकवतो, हे सत्य समोर आलं आहे. त्यामुळे भविष्या मध्ये भारत पाकिस्तानवर जमीन, पाणी आणि हवाई या मार्गे कारवाई करू शकतो, ज्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवला जाईल, अशी शक्यता नाकारता येत नाही.

बैठकीत मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदीचा निर्णय झाला आहे

पाकिस्तानच्या आजच्या आगळिकी नंतर पंतप्रधान मोदींनी तात्काळ केंद्रीय कॅबिनेट बैठक बोलावलीय, यावेळी सध्या पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर दबाव असल्याने, पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याची आगळीक करू शकतो. पंतप्रधान मोदि यांनी बोलावलेल्या या बैठकीत मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदीचा निर्णय झाला आहे, त्यामुळे पाकिस्तानला हा मोठा इशारा असू शकतो

देश भरातील जवळपास सहा विमानतळे बंद केली

दरम्यान सकाळी पाकिस्तानी लढाऊ विमानाच्या घुसखोरी मुळे, सुरक्षेच्या कारणास्तव अमृतसर, पठाणकोट, चंदिगढ आणि इतर चार विमानतळे आणि उड्डाणे बंद ठेवण्यात आली आहेत.

एअरस्ट्राईक नंतर पुन्हा एकदा तिन्ही दले सज्ज

दरम्यान, एअरस्ट्राईक मुळे बिथरलेल्या पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारत सक्षम असून सर्वत्र सीमा रेषेवर हायअलर्ट जारी केला गेला आहे, एअरस्ट्राईक नंतर पुन्हा एकदा तिन्ही दले सज्ज झाली आहेत.