
दिल्ली निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांच्या फाशीचा दिवस आगदी जवळ आला आहे. दरम्यान आरोपींपैकी एक मुकेश यांच्या याचिकेवर उद्या कोर्ट निर्णय देणार आहे. मुकेशने कसमा याचिका मागितली होती. याबद्दल उद्या निर्णय देण्यात येणार आहे.
ABP माझाच्या एका रिपोर्ट नुसार, मुकेश यांच्या बाजूने वकील अंजना प्रकाश यांनी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद केला होता ज्यात ते म्हणाले, ” आरोपी मुकेशने 14 जानेवारीला तुरूंगातील अधिकाऱ्यांसमोर दया याचिका सादर केली, 16 जानेवारी रोजी राष्ट्रपतींना मिळाली व 17 जानेवारी रोजी त्यांनी याचिका फेटाळली! म्हणजे याचिका मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रपतींनी याचिका फेटाळली आहे. अर्थात असे दिसते आहे की त्यांनी सर्व बाबींचा विचार न करता घाई-घाईने हा निर्णय घेतला आहे. आम्ही याचिकेत म्हटलेल्या गोष्टींशी संबंधित कागदपत्रेसुद्धा सरकारने राष्ट्रपतींसमोर सादर केलली नाहीत.” आता उद्या के होईल ते वेळचं सांगेल मात्र निर्भयाची आई आणि नेटकरी मुकेशसह इतर सर्व आरोपींना देखील फाशी व्हावी अशी मागणी करीत आहेत