Home तंत्रज्ञान “हे ऍप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर तात्काळ डिलिट करा; नाहीतर बँक खाते...

“हे ऍप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर तात्काळ डिलिट करा; नाहीतर बँक खाते होईल रिकामे!”

0

सध्या सायबर सिक्युरिटी अत्यंत महत्त्वाची झाली असून ऑनलाईन माध्यमांद्वारे फ्रॉड करून पैसे लुबाडल्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशातच Sophos या सॉफ्टवेअर फर्मच्या कार्यकर्त्यांनी अँड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांना २३ ऍप्स तात्काळ डिलीट करण्याचे सूचित केले आहे. हे ऍप्स सायबर सुरक्षेच्या दृष्टीने घातक असून या ऍप्समुळे कुठल्याही माहितीशिवाय आणि पूर्वकल्पनेशिवाय अकाउंटमधील पैसे कमी होऊ शकतात. हे ऍप्स गुगल प्ले स्टोअरच्या पॉलिसीचे उल्लंघन करणारे असून हे सर्व फ्लीसवेअर्स असल्याची माहिती Sophos ने रिपोर्टमधून दिली आहे.

Sophos च्या संशोधकांनी अशा २३ ऍप्सची यादी दिली असून हे ऍप्स लवकरात लवकर आपल्या मोबाईलमधून डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे. या ऍप्सची यादी पुढीलप्रमाणे :

com.photoconverter.fileconverter.jpegconverter

com.recoverydeleted.recoveryphoto.

com.screenrecorder.gamerecorder.screenrecording

com.photogridmixer.instagrid

com.compressvideo.videoextractor

com.smartsearch.imagessearch

com.emmcs.wallpapper

com.wallpaper.work.application

com.gametris.wallpaper.application

com.tell.shortvideo

com.csxykk.fontmoji

com.video.magician

com.el2020xstar.xstar

com.dev.palmistryastrology

com.old.me

com.myreplica.celebritylikeme.pro

com.nineteen.pokeradar

com.pokemongo.ivgocalculator

महाराष्ट्र टाइम्सच्या रिपोर्टमधून मिळालेल्या अधिक माहितीनुसार हे ऍप्स ज्यांनी डाउनलोड केले आहेत त्यांना ‘फ्री ट्रायल’ कधी संपेल याची कल्पना देण्यात आली नसून ही ट्रायल संपल्यावर कितो पैसे कापण्यात येतील हेदेखील सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे हे ऍप्स मोबाईलमध्ये असल्यास कधीही अकाउंटमधून कधीही पैसे जाऊ शकतात.