प्राईम नेटवर्क : दिल्ली दंगली मध्ये हिंसाचार करणारा पोस्टर बॉय शाहरुख खान याला उत्तर प्रदेश मधील शामलीतून अटक करण्यात आली आहे. शाहरुख ने दिल्ली च्या रस्त्यांवर २५ फेब्रुवारी रोजी कहर माजवला होता. त्याने दिल्ली पोलिसांवर पिस्तूल रोखली होती, तर पोलिसां समोर त्याने अनेक राउंड फायर केले होते, मात्र दिल्ली क्राईम ब्रांचने शाहरुखला अटक केली आहे.
सोशल मीडियात व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्या नंतर, शाहरुखने काही दिवसांपासून मोबाईल, फेसबुक, ट्विटर बंद केलं होतं, मात्र दिल्ली पोलीस अंधारात तिर चालवत होते, आज सकाळी त्यांना शाहरुखला पकडण्यात यश मिळवलं.
शाहरुख याला पकडल्या नंतर हि पिस्तूल त्याच्याकडे कशी आली ? उत्तर प्रदेश मधून दिल्लीत आल्यांनतर त्याला कोणी मदत केली ? त्याचा अजून कुठल्या गुन्ह्यांशी संबंध आहे ? अशा अनेक विविध प्रश्नांची उकल आता दिल्ली पोलिसांना करणं अधिक शक्य होईल.