Home राजकीय धोनीची बायको साक्षीने केली ट्विट द्वारे पोल खोल…

धोनीची बायको साक्षीने केली ट्विट द्वारे पोल खोल…

0

झारखंडला विधानसभा निवडणुकामचे वेध लागले असता दुसरीकडे मुख्यमंत्री रघुवीर दासांची सरकार राज्यात शून्य लोड शेडिंगचे आश्वासन देत आहे. अशात भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षीची ट्विट या आश्वासनांना सणसणीत उत्तर देत आहे. साक्षीने गुरुवारी ट्विटवर लिहिलं की, “रांचीचे लोक दररोज लोडशेडिंगला सामोरे जात आहेत.”

तिची सविस्तर ट्विट पुढील प्रमाणे होती, “रांचीचे लोक दररोज लोडशेडिंगला सामोरे जात आहेत. रोज चार ते सात तास वीज कापली जाते. १९ सप्टेंबर २०१९ म्हणजे आज गेल्या ५ तासांपासून लाईट नाही. आज वीज कापण्याचं काहीच कारण नाही. वातावरण साफ आहे व कुठला उत्सवही नाही. आशा करते की या समस्येची दखल जबाबदार ऑथोरिटीकडून घेतली जाईल.”

ट्विट मध्ये स्पष्ट उल्लेख नसला तरी अप्रत्यक्षपणे हा रघुवीर दास यांना दिलेला जोरदार टोला आहे असे स्पष्ट होत आहे. रघुवीर दास यांनी ३१ जुलै रोजी शून्य लोडशेडिंगची घोषणा केली तसा विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही शिक्कामोर्तब केला. मात्र नंतर कुठे माशी शिंकली देव जाणे. मीडिया न्युज नुसार साक्षीचं ट्विट रघुवीर यांची पोल खोल करीत आहे.