Home आरोग्य “येत्या रविवारी घराच्या बाहेर पाऊल सुद्धा ठेवू नका” : पंतप्रधान मोदी

“येत्या रविवारी घराच्या बाहेर पाऊल सुद्धा ठेवू नका” : पंतप्रधान मोदी

0

सध्यातरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाजारात कोणतेही औषध उपलब्ध नाही, संकल्प आणि संयम या दोहोंच्या आधारेच या भीषण संकटाचा सामना करता येऊ शकतो. त्यासाठी रविवारी (२२ मार्चला) सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत “जनता कर्फ्यू’ (जनता संचारबंदी) पाळावा, असे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना जबाबदारीचे भान बाळगण्याची सूचना केली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या ‘राष्ट्ररक्षकांप्रती’ कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सुद्धा जगातल्या सगळ्या देशांवर इतका मोठा गंभीर परिणाम झाला नव्हता जेवढा कोरोनामुळे सध्या सुरू आहे. भारतीयांनी कोरोनाचा प्रभावीपणे सामना केलाय, याचं मला कौतुक आहे. सगळं काही ठीक आहे; मात्र जागतिक महामारी असलेल्या कोरोनामुळे निश्चिंत होण्याची ही वेळ निश्चितच नाही. प्रत्येक भारतीयाने सजग राहणं आवश्यक आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे.

आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही. पण प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांचं पालन करुया। भारतात या जागतिक संसर्ग पहोणार नाही हे मानणं चुकीचं ठरेल. अद्यापही संकट टळलेले नाही, प्रत्येक भारतीयाने जागरुक राहायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले.