Home तंत्रज्ञान कर्नाटकात आज सकाळी सहा वाजता विमान क्रॅश…

कर्नाटकात आज सकाळी सहा वाजता विमान क्रॅश…

0

संरक्षण संशोधन आणि विकास (Defence Research and Development Organisation) संस्थेचे एक मानवरहित एरियल व्हेईकल (यूएवी) मंगळवारी सकाळी कर्नाटक येथे दुर्घटनेचे शिकार झाले. चित्रदुर्ग जिल्ह्यातील जोडीचिकेनहल्लीमध्ये सकाळी सहा वाजता यूएव्ही दुर्घटनाग्रस्त झालं. हे डीआरडीओचं रुस्तुम-२ यूएव्ही आहे, ज्याची आज ट्रायल चालू असतांना हा प्रकार घडला. घटनास्थळी डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.

चल्लकेरे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) येथे आउट-डोअर परीक्षणे केली जातात. इथेच डीआरडीओच्या वतीने मानवरहित विमानांसाठी काम केले जाते. चित्रदुर्गचे ए सी पी या घटनेसंदर्भात बोलतांना म्हणाले, “डीआरडीओचं रुस्तुम-२ ट्रायल मध्ये फेल झालं आणि क्रॉस होऊन मोकळ्या मैदानात कोसळलं.” लोकांना याची काहीही एक कल्पना नव्हती म्हणून अपघात झाल्या बरोबर पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. सुदैवाने अपघातात कुणालाही इजा झाली नाही.