Home राष्ट्रीय नातेवाईकांसह १६ नराधमांनी केला आठ वर्षांच्या चिमुकलीचा बलात्कार : उपचारा दरम्यान मृत्यू

नातेवाईकांसह १६ नराधमांनी केला आठ वर्षांच्या चिमुकलीचा बलात्कार : उपचारा दरम्यान मृत्यू

0

तामिळनाडूमध्ये एक अतिशय निंदास्पद घटना समोर आली आहे. एका आठ वर्षांच्या मुलीवर १६ जनांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. यापेक्षाही वाईट म्हणजे बलात्कार करणाऱ्यांपैकी काही त्या चिमुकलीचे नातेवाईकचे होते. या दुर्दैवी घटनेत त्या चिमुकलीचा बळी गेला असून तामिळनाडू मध्ये या घटनेने लोकांना हादरून सोडलं आहे.

सामनाच्या रिपोर्टनुसार अशी माहिती मिळत आहे की तामिळनाडू चेन्नई मधील पीडित चिमुकलीवर २०१७ पासून काही नातेवाईक व इतर लोक सातत्याने बलात्कार करीत होते. २०१९ मध्ये ही घटना समोर आली होती. मिळालेल्या अधिक माहितीनुसार गुरुवारी अर्थात १३ फेब्रुवारी रोजी पीडित मुलीच्या पोटात अचानक दुखायला लागलं व ती शौचालयात गेली असता तिला अचानक चक्कर आली व तिथेच ती बेशुद्ध पडली. बराच वेळ मुलगी बाहेर येत नाही हे पाहून दार वाजवण्यात आलं. तिला आवाज देण्यात आले मात्र आतून काहीच आवाज नाही आला. शेवटी दरवाजा तोडल्यावर मुलगी बेशुद्धावस्थेत मिळाली. ताबडतोब तिला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सविस्तर तपासणी पोलीस करीत आहेत.