Home राष्ट्रीय पुलवामामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू.

पुलवामामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू.

0

प्राईम नेटवर्क : पुलवाम्यात 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका बसवर भ्याड हल्ला केला होता. त्यात आपले 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली होती. त्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी जोरदार सर्च ऑपरेशन राबवलं असून, याचदरम्यान 4 दहशतवादी पिंगलान येथे लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. जवानांनी परिसराला चारही बाजूंनी घेरलं असून, दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे.

श्रीनगर- जम्मू काश्मीर मधल्या पुलवाम्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत चार जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे.

पुलवाम्यातील पिंगलान भागात दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला आहे आणि जवानही त्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत. दहशतवादी एका घरात लपून बसले असून, तिथूनच ते जवानांवर गोळीबार करत आहेत, या गोळीबारात चार जवान शहीद झाले असल्याची माहिती समोर आली आहे. उरी नंतरचा सर्वात मोठा हल्ला पुलवाम्यात झाला होता.