कोरोनाच्या काळात अनेक लोक बेरोजगार झाले आहेत, हातच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले मात्र आता Flipkart व Amazon सारख्या नामांकित ई-कॉमर्स कंपन्या या फेस्टिव्ह सीजनमध्ये जवळपास ३ लाख लोकांना नव्याने संधी देणार आहेत. कंपन्यांचा देखील यात फायदाच असणार आहे. विक्री वाढविण्यासाठी ही बंपर भरती होणार असून ‘फ्लिपकार्ट व अॅमेझॉन सारख्या अनेक ई-कॉमर्स कंपन्या देशातील ३ लाख जणांना नोकऱ्या देणार आहेत.’
लोकमतच्या रिपोर्ट नुसार दर वर्षी या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात होतात मात्र RedSeer च्या म्हणण्यानुसार, आजकाल ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे २० टक्के कामगारांची कपात केली जाणार नाही. एकंदरीत नोकरी गेलेल्या युवकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे जिच्या माध्यमाने आयुष्याचा गाडा रुळावर येऊ शकतो. विशेष म्हणजे या नियुक्त्या अर्धवेळ व पूर्णवेळ तत्त्वानुसार जाणार आहेत. शिवाय ३ लाख नोकऱ्यांपैकी सुमारे ७० टक्के अॅमेझॉन व फ्लिपकार्टद्वारे देण्यात असेही सांगितले जात आहे, तुम्हालाही नोकरीची गरज असेल तर हीच संधी आहे Flipkart व Amazon सारख्या नामांकित ई-कॉमर्स कंपन्यामध्ये नोकरी करण्याची.