Home आरोग्य “उडणाऱ्या माशा घरात कोरोना घेऊन येऊ शकतात” : अमिताभ बच्चन

“उडणाऱ्या माशा घरात कोरोना घेऊन येऊ शकतात” : अमिताभ बच्चन

0

कोरोना हा विषाणू मानवी विष्टेवर दोन आठवडे राहू शकतो, असं लॅसेन्टच्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे. या रिसर्चच्या आधारावर बॉलिवडूचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी यांनी हा आजार उडणाऱ्या माशांद्वारे पसरु शकतो, असे ह्या ट्विट सोबत सांगितले.

या पार्श्वभूमीवर याबद्दलचा एक व्हिडीओ बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे. “प्रत्येकांनी दररोज, नेहमी आणि कायमचं आपल्या टॉयलेटचा वापर करा, दरवाजा बंद तर आजार बंद!!”, असं अमिताभ बच्चन यांनी या ट्वीट करत म्हटले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले,” आपण सर्वांनी मिळून या संकटाला दोन हात करायचे आहेत. तुम्हाला माहित आहे का? चीनच्या तज्ञांनी सांगितले की, कोरोना विषाणू हा मानवी विष्टेवरसुद्धा आठवडाभर जीवंत राहू शकतो!”, असं अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि ह8 चिंताजनक बाब आहे. काल सांगली, मुंबई, पनवेल आदी भागात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या रुगणांचा आकडा १२४ वर पोहोचला आहे.