Home राष्ट्रीय परदेशातले नागरिक ह्यांचे जीव की प्राण आणि मजुर कामगार म्हणजे यांच्या सवती...

परदेशातले नागरिक ह्यांचे जीव की प्राण आणि मजुर कामगार म्हणजे यांच्या सवती : सदाभाऊ खोत

0

मुंबई, पुणे, सुरत येथे अडकलेले अनेक जण सद्या गावाकडे आपल्या घराकडे परत प्रवास करत येत आहेत पण ते गावाकडे आल्यानंतर गावातले लोक व स्थानिक पुढारी हे त्यांना गावात घेऊ देत नाहीत किंबहुना हाकलून लावतात. मतदान जवळ आले की ह्याच मजुरांना घरी आणण्याची सगळी सोय केली जाते मात्र आपत्तीच्या काळात त्यांच्याशी असा दुजाभाव का असा खडा सवाल आमदार सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

“या मजुरांना आणि कामगारांना आम्ही वाऱ्यावर सोडू देणार नाही, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मोठे आंदोलन करू”, असा इशारा सदभाऊनी दिला आहे.

” मुंबई पुण्याहून येणाऱ्या आमच्या या भावा बहिणींजवळचे पैसे संपले आहेत, अन्नधान्य संपले आहे. असे असताना सुद्धा हजारो मैल पायपीट करून ते गावापर्यंत पोहचत आहेत. सरकारला विदेशातून नागरिक आणण्यासाठी अक्कल आहे मात्र या मजुरांसाठी सवतीची भूमिका का घेतली जाते?” असा प्रश्न सदभाऊंनी विचारला आहे.