Home माहितीपूर्ण ‘या’ मॉल्स मध्ये मिळत आहे मोफत जेवण; पण एका अटीवर!

‘या’ मॉल्स मध्ये मिळत आहे मोफत जेवण; पण एका अटीवर!

0

महाराष्ट्रात 10 रुपयात जेवण मिळणार म्हणून राज्यभरात आनंद व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे भाजप 5 रुपयात पोटभर जेवण देणार असे अस्वासन करत आहे. मात्र दिल्लीत फुकट जेवन मिळणार आहे. तेही अशातशा ठिकाणी नाही तर चक्क मॉल मध्ये! अट फक्त ही आहे की 250 ग्रॅम प्लॅस्टिक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला नाश्ता तर 1 किलो प्लॅस्टिक घेऊन येणाऱ्या नागरिकाला दुपारी वा रात्रीचे जेवण मोफत मिळणार आहे.

‘लोकमत’च्या रिपोर्ट नुसार, दिल्ली महापालिका नजफगड झोनचे उपायुक्त संयज सहाय यांनी ही योजनेला सुरवात केली आहे. त्यांनी सांगितले की, दिल्लीतील द्वारकेच्या दोन मॉलमध्ये गारबेज कॅफे सुरू करण्यात आले आहेत. दिल्लीला पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त करायचे आहे. या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले असून त्यासाठीच याला ‘गारबेज कॅफे’ नाव देण्यात आलं आहे. वर्धमान प्लस सिटी मॉल आणि सिटी सेंटर मॉलमध्ये या दोन मॉल मध्ये हे कॅफे चालू करण्यात आले असून हळूहळू जनतेचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.