Home राष्ट्रीय देशातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याची गडकरींची मोठी योजना

देशातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याची गडकरींची मोठी योजना

0

देशातील वाढत्या प्रदूषणाला अनेक घटक कारणीभूत आहेत त्यातील च एक म्हणजे गाड्यांमुळे होणारे प्रदूषण आणि त्यांची वाढती संख्या. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली झाली पाहिजे जेणेकरुन लोक खासगी ऐवजी सार्वजनिक वाहतूक करतील.

कोरोना च्या वाढत्या महासाथीच्या दरम्यान नितीन गडकरी नी सांगितले की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं आधुनिकीकरण करण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये अधिकतर CNG, इलेक्ट्रिक वाहने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सहभागी केल्याने प्रदूषण कमी करता येऊ शकतं. ज्यामुळे इंधनामध्येही बचत होईल आणि त्याचा देशाला मोठा फायदा होईल तसेच प्रदूषण ही कमी होईल.

नागपूर मध्ये 450 बसेसना बायोफ्लूयमध्ये बदलण्यात आलं आहे. आतापर्यंत 90 बसेस बायोफ्यूलमध्ये बदलण्यात आली आहे. बसेसमध्ये इंधनाचा वापर केल्यामुळे वर्षाला तब्बल 60 कोटी रुपयांची गरज असते आणि तो खर्च आपण कमी करू शकतो.पुढे गडकरी म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी लंडन बस मॉडेल चा वापर करण्याची गरज आहे.