Home माहितीपूर्ण १० लाख रुपये, एक प्लॉट आणि सरकारी नोकरी द्या : हैदराबाद एन्काऊंटरमधल्या...

१० लाख रुपये, एक प्लॉट आणि सरकारी नोकरी द्या : हैदराबाद एन्काऊंटरमधल्या आरोपीच्या कुटुंबाची मागणी

0

हैदराबाद प्रकरणातील आरोपींच्या कुटूंबियांनी १० लाख रुपये, एक प्लॉट आणि सरकारी नोकरीची मागणी केली आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या एका रिपोर्ट नुसार, हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपी काही दिवसांपूर्वी घटनास्थळी झालेल्या चकमकित एन्काऊंटरमध्ये ठार झाला. त्या आरोपीच्या कुटुंबीयांनी सरकारकडे १० लाख रुपये, एक प्लॉट आणि सरकारी नोकरीची मागणी केली आहे. “माझा नवरा तर मेला, तो आता परत येणार नाही. पण मला काहीतरी गावातच नोकरी द्यावी ज्याने माझं घर चालेल” अशी मागणी आरोपीच्या पत्नीने केली आहे. तर, “मी माझा मुलगा गमावला आहे, सरकारने आम्हाला नुकसान भरपाई म्हणून १० लाख रुपये आणि एक प्लॉट द्यावा.” अशी मागणी आरोपीच्या आईने केली आहे.

त्याचबरोबर मिळालेल्या अधिक माहितीनुसार आरोपींच्या कुटुंबीयांनी आरोपीचे मृतदेह कधीपर्यंत सोपवणार याची देखील चौकशी केली आहे. आरोपींचे मृतदेह अद्याप शवागारात ठेवलेले असून न्यायालयीन आदेशानंतरच कुटुंबियांना सोपवण्यात येतील. आरोपींचे मृतदेह कुटुंबियांना सोपवण्याचा अद्याप आदेश मिळालेला नाही अशी माहिती आरोपींच्या कुटुंबियांना देण्यात आली.