Home तंत्रज्ञान मोफत कोरोना चाचणीच्या नावावर लुटणार तुमचे बँक अकाउंट, सरकारकडून मोठा सायबर हल्ल्याची...

मोफत कोरोना चाचणीच्या नावावर लुटणार तुमचे बँक अकाउंट, सरकारकडून मोठा सायबर हल्ल्याची चेतावणी

0

भारतामध्ये असलेल्या इंटरनेट यूझर्सवर फार मोठ्या सायबर हल्ल्याची भीती वर्तवत सरकारने खबरदारीचा इशारा दिला आहे. CERT या संस्थेनुसार वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्यासाठी व्यक्ती किंवा व्यवसायांना ‘कोविड’वर मोफत उपचाराचे आमिष दाखवून बळी पाडले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भारताची सायबर सिक्युरिटी एजन्सी ‘सीईआरटी-इन’ने सावधतेचा इशारा दिला आहे. सरकारी वित्तीय मदतीच्या वितरणावर देखरेखीचे काम करणाऱ्या सरकारी संस्था, शासकीय विभाग आणि व्यापारी संस्था यांच्यावर संभाव्य हल्ले होण्याची भीती वर्तवली आहे. महत्वाचे म्हणजे हा हल्ला करण्यासाठी त्यांनी भारत सरकारच्या मेल id सारखा हुबेहूब id वरून mail पाठवून होणार असल्याचे कळते.

स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच इतर बँकांनी जाहीर सूचना दिल्या आहेत, “आम्हाला CERT या संस्थेद्वारे माहिती मिळाली आहे की Cyber गुन्हेगारांकडून आपल्या संगणकीय कार्यप्रणाली वर हल्ला होऊ शकतो, हा हल्ला ncov2019@gov.in या पत्त्यावरून एक बनावट संदेश येऊन होऊ शकतो. या गुन्हेगारांची २० लाख लोकांना हेरण्याची तयारी असल्याचे प्रथमदर्शनी समजते, मोफत कोरोना चाचणी च्या नावाखाली हा सायबर दरोडा टाकण्याचा मानस आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद येथे राहणाऱ्या रहिवाश्यांनी सदर हल्ल्याबाबत जागरूक राहावे आणि असला कुठलाही मेल आल्यास त्याला उत्तर देऊ नये.” अशी सूचना बँकांमार्फत देण्यात येत आहे.