Home राष्ट्रीय अयोध्या निकालानंतर “या” आजींनी सोडला २७ वर्षांचा उपवास…

अयोध्या निकालानंतर “या” आजींनी सोडला २७ वर्षांचा उपवास…

0

अयोध्येचा वाद भारतात आता लहान लहान मुलांना देखील ठाऊक होता. जेव्हा बाबरी मशिद पाडण्यात आली आणि देशभरात दंगली होऊ लागल्या तेव्हा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच एक आजीही खूप व्यथित झाल्या आणि हा वाद एकदाचा मिटावा व अयोध्येत राम मंदिर व्हावे म्हणून तेव्हापासून त्यांनी केवळ दूध व फळे खाऊन उपवास करण्याचा निर्णय घेतला. आज या आजी ८१ वर्षांच्या आहेत. गेल्या २७ वर्षांपासून त्या हा उपवास करीत होत्या. अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने त्या सुखावल्या आहेत व त्या आता हा उपवास सोडणार आहेत.

उर्मिला चतुर्वेदी हे या आजींचं नाव असून त्या मूळ जबलपूरच्या रहिवाशी आहेत. पूर्वी त्या संस्कृतच्या शिक्षिका होत्या. त्यांची कायमच श्री रामांवर नितांत श्रद्धा होती. म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचललं. अयोध्येच्या निकालासाठी त्या खुपच उत्सुक होत्या. शेवटी आलेल्या निर्णयाचा त्यांना आनंद झाला आहे व न्यायाधीशांचे आभार मानण्यासाठी त्यांनी न्यायाधीशांना पत्र देखील पाठवले आहे.

उर्मिला चतुर्वेदी उपवास सोडणार आहेत म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी एक मोठा सोहळादेखील आयोजित करण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर त्यांचा मुलगा अमित चतुर्वेदी याने सांगीतले की, “माझी आई फक्त श्री रामांची भक्त आहे. ती कुठल्याही राजकीय पक्षाला समर्थन देत नाही म्हणून या गोष्टीला राजकारणाशी जोडू नये.”