Home राष्ट्रीय अनलॉक ४.० ची नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर; जाणून घ्या काही महत्वाचे बदल

अनलॉक ४.० ची नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर; जाणून घ्या काही महत्वाचे बदल

0

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावातून देशाला हळूहळू पूर्वमार्गावर आणण्याच्या उपाययोजना सुरू आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने अनलॉक ४ संबंधातील नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत आधीच्या नियमांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. यात अनेक बंद असलेल्या गोष्टी सुरू करण्यात येत आहेत तर अनेक गोष्टी बंदच राहणार आहेत.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने अनलॉक ४ ची नियमावली बनवली आहे. त्यानुसार ७ सप्टेंबरपासून काही शर्थींसह मेट्रो रेल्वे चालू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम १०० लोकांच्या उपस्थितीत राबवण्यासही मान्यता दिली आहे. याशिवाय कुठल्याही देशांतर्गत वाहतुकीस आता ई-पासची आवश्यकता नसेल असेही सांगितले आहे. या नियमावलीची सविस्तर माहिती ANI या वृत्तसंस्थेने ट्विट करून दिली आहे.