Home राष्ट्रीय राज ठाकरेंना जोरदार झटका, राज्यातील निवडणुकीसाठी पुन्हा ईव्हीएम मशीनच वापरणार

राज ठाकरेंना जोरदार झटका, राज्यातील निवडणुकीसाठी पुन्हा ईव्हीएम मशीनच वापरणार

0

प्राईम नेटवर्क : ईव्हीएम’च्या मुद्द्यावरून देशभरात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता, यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. वास्तविक राज ठाकरेंसह, काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, मनसे यांच्यासह सर्वच विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधात आवाज उठवत होते.

मात्र यापुढे देशभरात होणाऱ्या निवडणुका या बॅलेटपेपर होणार नसून ईव्हीएम मशीनवरच होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे. बॅलेट बॉक्स हा इतिहास होता, आणि तो काळ आम्हाला पुन्हा देशात आणायचा नाही, मत पत्रिका हा भूतकाळ होता, हे न्यायालयाने सुद्धा स्पष्ट केलं असल्याचं ते यावेळी म्हटले.

त्यामुळे देशभरात यापुढे होणाऱ्या निवडणूका या मतपत्रिकेवर होणार नसून ईव्हीएम वरच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, याच मुळे सध्या ईव्हीएम विरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरें सह संपूर्ण विरोधकांना हा जोरदार झटका मानला जातोय.