Home राष्ट्रीय पोलिसांनी उभ्या पिकावर फिरवला JCB, मारहाण झाल्यावर हतबल शेतकऱ्याने पिले तणनाशक

पोलिसांनी उभ्या पिकावर फिरवला JCB, मारहाण झाल्यावर हतबल शेतकऱ्याने पिले तणनाशक

0

पोलिसांचं देवाचं रूप, जनतेचं रक्षक रूप आपण अनुभवलं आहे पण हेच पोलीस राक्षसी कृत्य करतात तेव्हा अंगावर शहारे येतात. अत्यंत मेहनत करून शेतात उगवलेल्या पिकावर जेव्हा पोलिसांनी JCB फिरवला आणि सर्व पीक जमीनदोस्त केलं त्यावेळी मध्यप्रदेश मधील दांपत्याला आभाळ कोसळल्या सारखे झाले. यानंतर या परिवाराला केलेली मारहाण करण्याचा व्हिडिओ बघून माणुसकी संपल्याची जाणीव येते.

मध्य प्रदेश मधील गुना जिल्ह्यात स्थानिक पोलिसांना ‘शासकीय मालकी असलेल्या शेतजमिनिवरील अतिक्रमण’ हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नुसार पोलीस दलाने कार्यवाही सुरू केली आहे मात्र या आदेशाचे पालन करतांना पोलिसांनी सर्व सीमा पार केल्या आहेत. “साहेब एवढं पीक येऊ द्या, दोन लाखाचं कर्ज काढलं आहे, त्यानंतर जमीन घ्या…” अशी विनवणी करणाऱ्या दांपत्याला पोलीस फरफटत ओढत नेत असल्याचे व्हिडिओ मधून समोर येत आहे. पोलिसांनी जेव्हा या दांपत्याच्या डोळ्यादेखत या पिकावर JCB फिरवला आणि सगळं पीक उध्वस्त केलं त्यावेळी या दांम्पत्याने तणनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर जेव्हा हे दांपत्य बेशुद्ध पडले त्यांना अतिशय घृणास्पद पध्दतीने उचलून नेण्यात आले.

सदर प्रकरण समोर आल्यानंतर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दोघांना हटवण्यात आले आहे. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या दुष्कर्म विरुद्ध प्रतिक्रिया उमटत आहेत, मध्य प्रदेश सरकार विरोधात सुद्धा विरोधी पक्षाने गळ काढायला सुरू केली आहे.