Home राजकीय ई-सिगरेट बंद होणार…

ई-सिगरेट बंद होणार…

0

ई-सिगरेट बंद होणार का ?

आज अर्थात १८ सप्टेंबर २०१९ रोजी एका महत्वाच्या मुद्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज एका महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. ही चर्चा प्रधानमंत्री आवास म्हणजेच ७ लोक-कल्याण मार्ग येथे होणार आहे. हाती आलेल्या मीडिया न्यूज नुसार सकाळी १०:३० ला ई-सिगरेट सह महत्वाच्या इतर मुद्द्यांवर निर्णय घेतले जाणार आहेत.

यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत इलेक्ट्रॉनिक सिगरेट बॅन करण्यावर विचार विनिमय केला जाणार आहे, भारत सरकार गेल्या काही दिवसांपासून ई-सिगरेट उत्पादन, विक्री, आयात या सर्वांवर बंदी घालण्यासाठी निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.