खेड्या गावात आणि मोठ्या शहरांमध्ये प्रसूती दरम्यान उपचारांच्या अभावामुळे अनेक महिलांना अथवा बाळाला आपला जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन १०० टक्के सुरक्षित मातृत्व मिळवण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सरकारने सुमन अर्थात सेफ मॅटर्निटी अॅश्युरन्स नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. सदर योजनेअंतर्गत देशातील १०० टक्के प्रसूती रुग्णालयात किंवा प्रशिक्षित नर्स यांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे असं सांगितलं जात आहे. या योजनेमुळे सर्वसामान्य लोक सुखावणार यात शंका नाही.
मीडिया न्यूज नुसार आरोग्य मंत्रालयाने अशी माहिती दिली की या योजने अंतर्गत प्रत्येक गर्भवती महिलेला सुरक्षित मातृत्वाची गॅरंटी दिली जाणार आहे. त्यानुसार गर्भवती महिलेला प्रसुतीआधी पहिले चार वेळा मोफत उपचाराचा अधिकार असेल. खरंतर आरोग्याच्या दिशेने मोदी सरकारचं हे एक चांगलं आणि मोठं पाऊल आहे. मात्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयामागे राजकीय स्वार्थ तर नाही ना अशीही चर्चा होत आहे.