Home राष्ट्रीय भारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी...

भारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA

0

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने ३० नोव्हेंबरपासून सुरु होणार असलेली विमानसेवा केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याआधी ऑक्टोबर महिन्यात सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३० नोव्हेंबरपासून सुरु करता येईल असे सांगितले होते. मात्र पुन्हा कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता सरकारने हा निर्णय बदलून परदेशी विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत DGCA ने एक परिपत्रक जारी केले असून त्यानुसार इंटरनॅशनल कार्गो विमाने व DGCA द्वारे मान्यताप्राप्त विमानांना उड्डाणाची परवानगी असेल. मात्र कोणाला परदेशात जायचे असल्यास त्यासाठी एअर बबल करारावर वर अवलंबून राहावे लागेल. या करारानुसार ज्या दोन देशांमध्ये हा करार झाला आहे त्या देशांतील एअरलाईन्सची विमाने त्या दोन देशांदरम्यान चालवली जाऊ शकतात. सध्या २२ देशांसोबत भारताने Air bubble pact केला आहे.