Home राष्ट्रीय इरफान खानची प्रकृति खालावली; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

इरफान खानची प्रकृति खालावली; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

0

प्रसिद्ध अभिनेता इरफान खानची सध्या कॅन्सरशी झुंज सुरु आहे. त्याच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आज सकाळी त्याची तब्येत अचानक बिघडली आहे.

इरफानला मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय.

इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर झाला आहे. त्यावरच त्याचे उपचार सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे त्याच्या या नियमित उपचारांमध्ये अडथळा तयार होत होता. त्यामुळेच त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

दरम्यान, २ वर्षांपूर्वी मार्च २०१८ मध्ये इरफानला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याने स्वतः ही धक्कादायक बातमी दिली होती.

दरम्यान, इरफान खानची आई सईदा बेगम यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून त्या आजारी होत्या. सईदा बेगम यांचे जयपूरमध्ये निधन झाले, मात्र लॉकडाऊनमुळे इरफान मुंबईत अडकला होता. कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने असहाय्य झालेल्या इरफानने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाणावलेल्या डोळ्यांनी आईला अखेरचा निरोप दिला.