Home तंत्रज्ञान इस्रोचे अध्यक्ष के. सिवन उत्तरले, “प्रथमतः मी भारतीय!”

इस्रोचे अध्यक्ष के. सिवन उत्तरले, “प्रथमतः मी भारतीय!”

0

चांद्रयान २ च्या मोहिमेपासून चर्चेत असलेले इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांच्या एका वाक्याने सर्व भारतीयांची मने जिंकली. एका वृत्तवाहिनीने अशातच के. सिवन यांची मुलाखत घेतली. तेव्हा माध्यम प्रतिनिधीने त्यांना प्रश्न विचारला की, ‘एका तमिळ व्यक्तीला एवढा मोठा सन्मान मिळाला, तर तुम्ही तामिळनाडूच्या जनतेला काय संदेश द्याल?’ त्यावर सिवन यांनी ‘आपण प्रथमतः भारतीय आहोत’ असे उत्तर दिले. या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर आज बराच व्हायरल होत आहे व सिवन यांचे जागोजागी कौतुक केले जात आहे.

मुलाखतीत बोलतांना सिवन पुढे म्हणाले, “मी एक भारतीय म्हणून इस्रोमध्ये आलो. इस्रो एक असं ठिकाण आहे जिथे अनेक राज्यांतील आणि विविध भाषिक लोक एकत्रितपणे काम करून आपले योगदान देतात.” या उत्तरामुळे तसेच सिवन यांच्या समंजस वागणुकीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. #SivanPrideOfIndia हा हॅशटॅगही आज बऱ्याच सोशल मीडिया साईट्सवर ट्रेंडिंगला आहे.